हत्याराचा धाक दाखवून पादचाऱ्याकडून ऐवज लुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्याराचा धाक दाखवून 
पादचाऱ्याकडून ऐवज लुटला
हत्याराचा धाक दाखवून पादचाऱ्याकडून ऐवज लुटला

हत्याराचा धाक दाखवून पादचाऱ्याकडून ऐवज लुटला

sakal_logo
By

पिंपरी : पादचाऱ्याला हत्याराचा धाक दाखवून ऐवज लुटल्याचा प्रकार हिंजवडीजवळील सुतारवाडी येथे घडला. याप्रकरणी ओंकार रवींद्र चव्हाण (रा. सुतारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ते सुतारवाडी येथील रस्त्याने पायी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण त्यांच्याजवळ आले. कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून फिर्यादीचा तीस हजारांचा मोबाईल, ४० हजारांची सोनसाखळी व पाच हजारांची रोकड लुटून आरोपी सुसखिंडीच्या दिशेने पसार झाले.

बँकेतून बोलत असल्याचे सांगत फसवणूक
बँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत एकाने दिगंबर भीमरावजी पराये (रा. संत तुकारामनगर,भोसरी) यांची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. दिगंबर यांना त्यांच्या मोबाईलवर आरोपीने फोन केला. एसबीआय बँक क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्डवर रिवार्ड प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून ओटीपी देण्यास भाग पाडले. त्यानंतर दिगंबर यांच्या क्रेडिट कार्डमधून ३ हजार ६८० रुपये परस्पर वळती करून फिर्यादीची फसवणूक केली.

कंपनीतील चोरीप्रकरणी एकाला अटक
भोसरी एमआयडीसीतील कंपनीत चोरी केल्याप्रकरणी सुनील जय भगवान चव्हाण (रा. विठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली . याप्रकरणी सिक्युरिटी ऑफिसर तीर्थ राजसीताराम यादव (रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सेंच्यूरेन्का कंपनीत साई एंटरप्रायझेस कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोपी चव्हाण हा हाऊस किपींगचे काम करतो. दरम्यान, कंपनीत शेडचे काम करणारे आर. बी. टेकनोक्रस्ट फॅब्रिकेशन यांची कंपनीत असलेली ३३ हजार ८०० रुपये किमतीची कॉपर व अल्युमिनियमची इलेक्ट्रिक वायर आरोपीने चोरली.

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
महिलेचा पाठलाग करीत बदनामी करून विनयभंग केल्याप्रकरणी तुषार वर्मा (वय ३५, रा. वेणूनगर, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग करून शेजाऱ्याकडे फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन अपशब्द वापरले. त्यानंतर फिर्यादी दुसऱ्या ठिकाणी कामावर रुजू झाल्या असता आरोपीने पुन्हा त्यांचा वारंवार पाठलाग केला. तेथील दुकानमालकालाही फिर्यादीला कामावर ठेऊ नका, तिच्यावर गुन्हे दाखल आहेत'' असे सांगत फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार वाकड येथे घडला.

अल्पवयीन मुलीला धमकी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच तिच्या वडिलांची व मामाला मारण्याची सुपारी देण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिघीजवळील बनाचा ओढा ते भारतमातानगर या दरम्यान घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची चौदा वर्षीय मुलगी बनाचा ओढा ते भारतमातानगर या मार्गाने पायी चालत येत असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला. तिच्याशी अश्लील भाषेत बोलले. दरम्यान, मुलगी त्यांना तुमचे नाव माझ्या वडिलांना व मामाला सांगते, म्हणाली. त्यावर ‘तू कोणालाही सांग, तुझ्या वडिलांची व मामाची मारण्याची सुपारी मी देतो’ अशी धमकी एका आरोपीने दिली. त्यानंतर शिवीगाळ केली.

लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नवीन लक्ष्मण बहादूर (वय ०, रा. विनायकनगर, पिंपळे गुरव) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याचे लग्न झालेले असताना फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने फिर्यादी गर्भवती राहिली. फिर्यादीला मुलगी झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी व तिच्या बाळाकडे दुर्लक्ष केले. लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नास नकार देत फिर्यादीला शिवीगाळ केली.