राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी उत्सव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज विजयादशमी उत्सव

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या (रविवार) शहरातील विविध भागात सोळा ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत, या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन असे कार्यक्रम होणार आहेत. शिवाय पाच ऑक्टोबरला विविध भागात पथसंचलनाचेही आयोजन केले असल्याची माहिती, जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली.

याठिकाणी होतील कार्यक्रम (भाग, वक्ते, स्थळ व वेळ)
संभाजी नगर ः गिरीश प्रभुणे, रामायण मैदान, जाधववाडी. सकाळी आठ
देहूरोड नगर ः रूपेश यादव, महात्मा गांधी विद्यालय, देहूरोड. सायंकाळी पाच
देहूनगर ः शैलेश शिंदे, श्रीकृष्ण मंदिरा शेजारी. सायंकाळी सहा
निगडीनगर ः सुहास महाजन, राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, मोहननगर. सायंकाळी सहा
चिखली ः जयंत जाधव. गणेश इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली. सायंकाळी साडेपाच
पिंपळे सौदागर ः अमोल पुसदकर, पी. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर. सायंकाळी साडेपाच
पिंपळे निलख : सुधीर गाडे, चोंधे पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्स. सायंकाळी सहा
काळेवाडी ः रविकांत कळंबकर, बेबिज इंग्लिश मीडियम स्कूल. सायंकाळी सहा
पिंपरी : केदार तापकीर, नव महाराष्ट्र शाळा, सकाळी सात
चिंचवड पूर्व, पश्चिम : सुनील देसाई, कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योगनगर. सायंकाळी साडेपाच
हिंजवडी गट ः नानासाहेब जाधव, कांतिलाल खिंवसरा शाळा, वाकड. सायंकाळी पाच
भोसरी ः अतुल अग्निहोत्री, न्यू संत तुकाराम पॅलेस हॉल. सायंकाळी साडेपाच
सांगवी गट ः केदार तापीकर, डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, संत तुकाराम नगर, सायंकाळी साडेसहा
कासारवाडी ः विलास पवार, पीसीएमसी शाळा कासारवाडी, सायंकाळी सहा
पिंपळे गुरव ः सचिन कुलकर्णी, रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव. सायंकाळी सहा
सांगवी ः नीलेश लाळे, न्यू मिलेनियम हायस्कूल. सायंकाळी साडेसहा