गुंतवणूकीच्या आमिषाने वृध्दाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणूकीच्या आमिषाने वृध्दाची फसवणूक
गुंतवणूकीच्या आमिषाने वृध्दाची फसवणूक

गुंतवणूकीच्या आमिषाने वृध्दाची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वृद्धासह इतर लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी रवी गवळी (रा. चिंचपोकळी, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडी येथे घडला.
याप्रकरणी बबन चंदर खोडवे (रा. एमआयडीसी जी ब्लॉक, संभाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सोसायटीत राहणारे बजरंग कांगणे यांच्या ओळखीचा आरोपी रवी हा फिर्यादीला भेटला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्याचा परतावा देतो, असे खोटे सांगितले. फिर्यादीने विश्वासाने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी आरोपीला १५ लाख रुपये दिले. मात्र, त्यातील १३ लाख १३ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी व इतर लोकांची फसवणूक केली.