चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना देहूगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. रंजिता साठे (वय ३९, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) हिच्या चारित्र्यावर पती सोहन प्रभाकर साठे (वय ४५) संशय घ्यायचा. यातून शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये सोहनने फावड्याच्या दांडक्याने रंजिता यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोहन काहीही कामधंदा करत नाही. रंजिता या एका कंपनीत नोकरीस होत्या.