सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी
सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी
सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी

सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया तज्ज्ञ नीलेश चव्हाणके यांचे ‘सोशल मीडियामध्ये करिअरच्या संधी’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानामध्ये नीलेश यांनी दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या सोशल मीडियाची योग्य ती ओळख करून दिली. आजच्या काळात मोबाईलमुळे भरकटलेल्या तरुण वर्गाला सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा आणि त्याद्वारे फायदा कसा करून घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडियामुळे होणारे फायदे व त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि भविष्यातील करिअरच्या संधी अशा अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या.
प्राध्यापक डॉ. प्रशांत कुंभारकर तसेच प्राध्यापक अविनाश गोलांडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यिन पिंपरी चिंचवड व ग्रामीणचे समन्वयक अक्षय बर्गे, शहर उपाध्यक्ष तथा महाविद्यालयीन अध्यक्ष विक्रम खाडे, उपाध्यक्ष आकाश जाधव, कोअर टीम सदस्य धृव कठाळे व पियूष इंगोले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यिन फोरममधील विद्यार्थी दिया साळुंखे, मृणाल शास्त्रकार, ओम सोनवणे व महाविद्यालयीन यिन कोअर टीमने विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. प्रशांत कुंभारकर यांनी केले. दिया साळुंखेने सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश गोलांडे यांनी आभार मानले.