आकुर्डीत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
आकुर्डीत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

आकुर्डीत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो व प्रबंधक अनिल शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर राठोड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी केलेल्या कार्याचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींचे आत्मचरित्र वाचावे, असे आवाहन केले. डॉ. बी. जी. लोबो यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड, डॉ. दत्तात्रेय भांगे, रंजीत चव्हाण, राजू ननावरे, सुखदेव लोखंडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.