गुन्हे वृत्त बांधकाम व्यवसायिकाकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त 
 
बांधकाम व्यवसायिकाकडून
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
गुन्हे वृत्त बांधकाम व्यवसायिकाकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

गुन्हे वृत्त बांधकाम व्यवसायिकाकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : जागा विकसन करार व कुलमुखत्यार पत्र करून बांधकामासाठी दिली. मात्र, बांधकाम पूर्ण न करता नियमाने मिळणारे बांधकाम परस्पर विकले. तसेच दुसरीकडे फ्लॅट दाखविण्याचे आमिष दाखवून ३३ लाख रुपये घेत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी आर के डेव्हलपर्सतर्फे पंकज काशिनाथ पाटील (वय ३१, रा. पिंपळे निलख, मूळ- नंदुरबार ) या बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी रमाकांत गोपाळ आसलकर (वय ७३, रा. तालेरानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे भागीदार यांनी आरोपींना त्यांची चिंचवड येथील जागा विकसन करार व कुलमुखत्यार पत्र करून बांधकामासाठी दिली. त्यानंतर आरोपीने हे बांधकाम पूर्ण न करता फिर्यादी यांना नियमाने मिळणारे बांधकाम परस्पर विकले. तसेच आरोपीने फिर्यादी यांना आर्थिक अडचणीचे कारण सांगून व रावेत येथील साईटवर फ्लॅट दाखविण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीकडून ३३ लाख रूपये घेऊन ते परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------

मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

वाकडमधील विनोदेवस्ती येथे टपरी चालकाला दमदाटी करीत शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील ऊर्फ भोऱ्या घाडगे, दीपक (दोघे रा. काळाखडक, वाकड) व एक अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सूरज अरुणराव जेणकेवाड (वय २५, रा. वाकड, मूळ - लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची विनोदेवस्ती येथे पान टपरी असून, ते टपरीत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी सूरजला तू कुठला आहेस, इथे का आला, असे विचारत दम दिला. शिवीगाळ करून मारहाण केली. दगडाने मारून जखमी केले.
------------------------


भरदिवसा घरातून दागिने चोरीला

बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात शिरलेच्या चोरट्याने भरदिवसा पंधरा मिनिटात दागिने लंपास केले. हा प्रकार रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी अशोककुमार राजेंद्र प्रजापती (रा. शिवराजनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर रविवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा या कालावधीत बंद होते. यावेळी चोरट्यांनी अवघ्या १५ मिनिटांत दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घराच्या कपाटामधील ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले.
---------------
कंपनीतून दोन लाखाचे पंप लंपास

चिंचवड एमआयडीसीमधील अग्रवर्ती प्रोसेस इंजिनिअर्स या कंपनीतून चोरट्याने दोन लाखाचे पंप चोरले.
सुनील विनायक शिंपी (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीच्या बाजूला एक ओढा असून ओढ्याच्या बाजूने चोरटे कंपनीत शिरले. त्यांनी कंपनीतून १ लाख ९८ हजार ७१२ रुपये किमतीचे दोन पंप चोरून नेले.
----------------

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा

वाकडमधील पार्क स्ट्रीट येथे बंगला विकताना फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश शांताराम पाटील (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित राजेंद्र गुप्ता व रचना गुप्ता (दोघेही रा. न्यू जर्सी, यूएसए) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पार्क स्ट्रीट येथील डायमंड पार्क हाउसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्याबाबत आरोपी गुप्ता व धीरज चंचलाणी यांचा वाद
सुरु आहे. तरीही आरोपींनी फिर्यादी यांना कोणतेही वाद सुरु नसल्याचे सांगत, कोणताही मेंटेनन्स बाकी नसून सर्व कागदपत्र क्लिअर आहेत, असे भासवले. सोसायटीची एनओसी मिळण्यासाठी आरोपींनी इण्डेमिनिटी बॉण्ड तयार करून पाटील यांची फसवणूक केली.
------------------------