मावळातील पाच शिक्षकांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळातील पाच शिक्षकांना पुरस्कार
मावळातील पाच शिक्षकांना पुरस्कार

मावळातील पाच शिक्षकांना पुरस्कार

sakal_logo
By

मावळातील पाच शिक्षकांना पुरस्कार

सोमाटणे,ता.४ ः राज्य शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ व माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने, भोर येथे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार सोहळ्यात मावळातील पाच शिक्षकांना आदर्श तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कारांनी नुकतेच सन्मानित करण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी, पुणे जिल्ह्यातील एकूण ६५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात मावळातील माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा व गेल्या तीस वर्षापासून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सौ.स्नेहल बाळसराफ (तळेगाव), मुख्याध्यापक संजय ओव्हाळ (कोथुर्णे), प्रवीणकुमार हुलावळे (देवघर), अशोक काळे (उर्से), सुजीत सुर्यवंशी (लोणावळा) या पाच जणांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार थोपटे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. जी.के थोरात, के.एस. ढोमसे, वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे, प्राचार्य दत्तात्रेय बाळसराफ, दत्तात्रेय अरकडे आदी यावेळी उपस्थित होते.