क्रिकेटसह इतर खेळांनाही राजाश्रय ः जितेंद्र वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटसह इतर खेळांनाही 
राजाश्रय ः जितेंद्र वाघ
क्रिकेटसह इतर खेळांनाही राजाश्रय ः जितेंद्र वाघ

क्रिकेटसह इतर खेळांनाही राजाश्रय ः जितेंद्र वाघ

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः ‘‘क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना राजाश्रय मिळू लागला आहे. उद्योगनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून शहराचे नावलौकिक व्हावे, यासाठी सर्व क्रीडा प्रकार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना शिकवायला हवेत. त्यासाठीच या स्पर्धांचे आयोजन केले आहे,’’ अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व महापालिका क्रीडा विभाग यांच्यातर्फे शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी आचार्य अत्रे रंगमंदिरात क्रीडा शिक्षकांसमवेत बैठक झाली. त्यास पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर, उपआयुक्त विठ्ठल जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, दादासाहेब देवकाते, श्रीकांत हरनाळे, अनिता केदारी यांच्यासह शहरातील चारशे शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाच्या क्रीडा विषयक विविध योजनांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन कसगावडे यांनी केले.
इप्पर म्हणाले, ‘खेळाडूंनी केवळ गुणांसाठी न खेळता आपले क्रीडा गुण ओळखून क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणे आवश्यक आहे.’ क्रीडा विषयक सुविधा व प्रकल्पांची माहिती वाघ यांनी दिली. क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पवार यांनी आभार मानले.
---