फुल बाजारात कोट्यवधीची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुल बाजारात कोट्यवधीची उलाढाल
फुल बाजारात कोट्यवधीची उलाढाल

फुल बाजारात कोट्यवधीची उलाढाल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांना चांगलाच भाव आला होता. फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने पिंपरीतील फूल बाजारात सुमारे अडीचशे टन फुलांची आवक झाली, यातून एक कोटीपर्यंतची उलाढाल झाली.

खंडेनवमी व दसऱ्याच्या पूजेला झेंडूच्या फुलांना विशेष महत्व असते. यासह इतरही फुले पूजेसाठी आवश्यक असल्याने सर्वच फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे दरही वाढले होते. पिंपरी फुलबाजारात विविध भागातून २०० ते २५० टन फुलांची आवक झाली. येथील २८ ते ३० गाळ्यातील प्रती व्यापाऱ्यांनी सुमारे ८ ते १० टन माल उचलला.
त्यानंतर येथून पिंपरी-चिंचवड शहरासह देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, लोणावळा, देहूगाव, आळंदी, हिंजवडी आदी भागातील विक्रेत्यांनी खरेदी केली. पहाटेपासूनच विक्रेत्यांनी बाजारात गर्दी केली होती. यामध्ये झेंडू, शेवंती, गुलछडी, ॲस्टर आदी फुलांचा समावेश होता. आपट्यांच्या पानांचीही मोठ्याप्रमाणात विक्री झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर येथे एक कोटी पर्यंतची उलाढाल झाली.
------------------
बाजारातील प्रति किलो दर
झेंडू ८० ते १००
अष्टर २०० ते ३००
शेवंती ३००ते ००
गुलछडी ५०० ते ६००
---------------------
‘‘झेंडूसह इतर फुलांनाही चांगली मागणी होती. फूल बाजारात दोन दिवसात फुलांची मोठ्याप्रमाणात आवक व विक्री झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा सुमारे एक कोटी पर्यतची उलाढाल झाली.’’
- गणेश आहेर, फूल विक्रेते