नालंदा मित्रसंघातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालंदा मित्रसंघातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन
नालंदा मित्रसंघातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन

नालंदा मित्रसंघातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : निगडी-प्राधिकरणातील नालंदा मित्र संघाच्या वतीने लुंबिनी बुद्धविहारामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला. उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते. विविध मनोरंजक कार्यक्रम झाले. तारा बोरकर यांनी पंचशील ध्वजवंदन केले. प्रवचनकार हिंगे गुरुजी यांनी धम्मपालन गया व दिवसाचे महत्त्व सांगितले. बेंद्रे परिवाराकडून ग्रंथालयासाठी कपाट व पुस्तके दिली. अध्यक्षीय भाषण व सूत्रसंचालन एस. के. ओव्हाळ यांनी केले. नीता बेंद्रे, सुरेश चव्हाण, रूपाली खैरे उपस्थित होते. अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.