कोजागिरीनिमित्त उद्या तळेगावला ‘चंद्र आहे साक्षीला मैफिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजागिरीनिमित्त उद्या तळेगावला ‘चंद्र आहे साक्षीला मैफिल
कोजागिरीनिमित्त उद्या तळेगावला ‘चंद्र आहे साक्षीला मैफिल

कोजागिरीनिमित्त उद्या तळेगावला ‘चंद्र आहे साक्षीला मैफिल

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन) ता. ८ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने उद्या रविवारी (ता.९) ''चंद्र आहे साक्षीला'' या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमीत, मधुसूदन ओझा निर्मित व रजनीगंधा प्रस्तुत ही मैफील तळेगाव दाभाडे येथील भालेकर कॉलनीतील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता होणार आहे. या मैफीलीचा तळेगावकर रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक व परिषदेच्या तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व कार्याध्यक्ष गणेश काकडे यांनी केले आहे. या मैफिलीमध्ये गायक अमोल यादव, सुजाता जोशी, आर्या काकडे, मधुसूदन ओझा, पं. सुरेश साखवळकर आणि सहकारी यांचे गायन होणार आहे. वादक संदेश खंडागळे, प्रवीण जाधव, चंद्रशेखर गायकवाड यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रमानंतर सर्व रसिकांसाठी दुग्धपानाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.