भोसरीत हप्त्यासाठी डॉक्टरला धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत हप्त्यासाठी डॉक्टरला धमकी
भोसरीत हप्त्यासाठी डॉक्टरला धमकी

भोसरीत हप्त्यासाठी डॉक्टरला धमकी

sakal_logo
By

भोसरीत हप्त्यासाठी डॉक्टरला धमकी

पिंपरी, ता. ८ : ''दर महिन्याला हप्ता दिला नाही तर दवाखाना चालवू देणार नाही. इलाक्यात फिरू देणार नाही'' असे धमकावत एका टोळक्याने क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरला शिवीगाळ केली. हा प्रकार भोसरी येथे घडला.
या प्रकरणी सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय २५), गोविंदा कोळी (वय २), सचिन सारसे उर्फ काळा सच्या (वय २३, सर्व रा. आनंदनगर, भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पुरुषोत्तम कारभारी राणे (रा. सेक्टर क्रमांक १, इंद्रायणीनगर, भोसरी) हे डॉक्टर असून त्यांचे शास्त्री चौक येथे क्लिनिक आहे. ते क्लिनिकमध्ये असताना आरोपी तेथे आले. राक्षे याने ''तू मला दर महिन्याला सात हजार रुपये हप्ता द्यावे लागेल, तरच तू दवाखाना चालवू शकतो. अन्यथा तुला दवाखाना चालवू देणार नाही व इलाक्यात फिरू देणार नाही, अशी फिर्यादीला धमकी दिली. तसेच दर महिन्याला गोविंदा कोळी व काळा सच्या येऊन तुझ्याकडून सात हजार हजार रुपये घेऊन जातील, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. बाहेर आल्यानंतर श्रेयस मेडिकलचे रोहिदास घेनंद यांच्या मेडिकलमधून औषधे घेऊन ''कसले पैसे मागतो, मी कधी कोणाला पैसे देतो का, तुला माहित नाही काय'' असे म्हणत तिघे तेथून निघून गेले. आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.