आज पिंपरी चौकातील वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पिंपरी चौकातील वाहतुकीत बदल
आज पिंपरी चौकातील वाहतुकीत बदल

आज पिंपरी चौकातील वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : हजरत मोहमंद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणूक निघणार आहे. यावेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (ता. ८) येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
चिंचवडमधील महावीर चौक येथून आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने जाणारी वाहतूक डी मार्ट येथून ग्रेड ग्रेडसेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. नाशिक फाट्याकडून सेवा रस्त्याने येणारी वाहतूक डेअरी फार्म व खराळवाडी येथील एच.पी. पेट्रोल पंप येथून ग्रेड सेपरेटरमध्ये वळवली जाईल. त्याचप्रमाणे स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणारा मार्ग बंद करून ही वाहतूक लिंक रोडकडे वळवली जाईल. नेहरूनगर चौकाकडून येणारी वाहतूक एच. ए. कॉर्नर बस थांब्यापासून मासुळकर कॉलनीकडे वळणार आहे. पिंपरीतील सम्राट चौक ते अहिल्यादेवी चौक दरम्यानचा मार्ग बंद असेल. ऑटो क्लस्टरकडे येणारी वाहतूक मदर टेरेसा ब्रिजवरून वळविण्यात येणार आहे. क्रोमा शोरूम कडून गोकूळ हॉटेलकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. तसेच पिंपरी चौकाकडून पुलाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे. हा बदल रविवारी दुपारी दोन ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.