Pimpri : चिंचवड येथे ज्येष्ठ नागरिकांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizens
चिंचवडला ज्येष्ठ नागरिकांचा गौरव घालवल्यास सुखप्राप्ती

Pimpri : चिंचवड येथे ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

पिंपरी : ‘‘जीवनात वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालविल्यास सुख प्राप्ती होते’’, असे विचार ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडतर्फे, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विरंगुळा केंद्रात वयाची ७५ आणि ८० वर्षे पूर्ण केलेल्या संघाच्या सभासदांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते.

माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे आदी यावेळी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, ‘‘भगवद्‍गीतेद्वारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना कामना कमी करायला सांगितल्या. विनोबांनी त्याचा मराठी अनुवाद करताना कामना व्यापक, एकाग्र, सूक्ष्म आणि उदात्त केल्यास आपोआप कमी होतात, असा उपदेश केला आहे. सर्वसामान्य माणसाला जीवनात सुख हवे असते. पण, संतांसारखे निरपेक्ष वृत्तीने जगल्यास तसेच जीवनात वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालविल्यास सौख्य मिळेल.’’

ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवांचे विद्यापीठ असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी, त्रिवार ओंकार व शांतीमंत्राचे पठण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उषा गर्भे, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, हरी क्षीरसागर, भिवाजी गावडे, रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, सुनील चव्हाण यांनी संयोजन केले. गोपाळ भसे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले.