‘मंदिरे नेमकी बघायची कशी?’ यावर मिळाली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मंदिरे नेमकी बघायची कशी?’ यावर मिळाली माहिती
‘मंदिरे नेमकी बघायची कशी?’ यावर मिळाली माहिती

‘मंदिरे नेमकी बघायची कशी?’ यावर मिळाली माहिती

sakal_logo
By

पिंपरी, ता.१२ : भारतीय संस्कृतीचे उत्तम लक्षण म्हणजे इथे तयार झालेली सुंदर आणि परिपूर्ण मंदिरे. ही मंदिरे का बघायची? कशी बघायची? कुणी आणि का बांधली? यावर असलेल्या मूर्ती नक्की कुणाच्या आहेत?... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शहरातील जिज्ञासूंना मिळाली. ‘मंदिरांच्या देशा कलास्पर्श’ व्याख्यानमालेत इंद्रनील बंकापुरे यांनी अनोखी माहिती दिली.

विरासत इंडियन हेरिटेज इनिशिएटिव्ह आणि संस्कार भारती पिंपरी-चिंचवड यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला निगडीमधील सावरकर सदन येथे झाली. बंकापुरे यांनी मंदिरांच्या विविध प्रकारांची माहिती देवून, विविध देवी-देवता, त्यांच्या शिल्पांमध्ये काळानुरूप झालेले बदल दृकश्राव्य माध्यमातून उदाहरणासह दाखवले गेले. अनेक दंत कथांची माहिती देखील कल्पक प्रकारे सांगितली.

व्याख्यानाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या उपाध्यक्ष सुवर्णा बाग, प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तू विधा संयोजिका भाग्यश्री पाटसकर, सहसंयोजिका विनिता देशपांडे, समिती उपाध्यक्ष हर्षद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सतीश वर्तक, प्रफुल्ल भिष्णूरकर, सारंग चिंचणीकर, सायली काणे, प्रिया जोग, वरदा वैशंपायन, चिन्मय बहुलेकर, प्रचिती भिष्णूरकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आसावरी बर्वे यांनी केले. लीना आढाव यांनी आभार मानले.