रोख बक्षीस योजनांमधील बदलामुळे विद्यार्थी, पालकात नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोख बक्षीस योजनांमधील बदलामुळे विद्यार्थी, पालकात नाराज
रोख बक्षीस योजनांमधील बदलामुळे विद्यार्थी, पालकात नाराज

रोख बक्षीस योजनांमधील बदलामुळे विद्यार्थी, पालकात नाराज

sakal_logo
By

पिंपरी, ता.१२ ः महापालिका नागरवस्ती विभागाअंतर्गत दहावी आणि बारावी बक्षीस योजना, तसेच इतर योजनांमध्ये प्रशासकीय कारभार सुरू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी अनेक बदल केले. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तरी सर्व योजनांमध्ये पूर्वीप्रमाणे बदल करावेत. तसा धोरणात्मक निर्णय प्रशासक म्हणून तातडीने घ्यावा, अशी मागणी महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली आहे.

प्रशासक शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस योजना अनेक वर्षापासून सूरू आहे. परंतु तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या प्रशासकीय काळात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८० वरून किमान ९०टक्के गुणमर्यादा वाढविली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दहा हजार रूपये बक्षीस रकमेला मुकावे लागले आहे. हा अन्याय असून ती पूर्वीप्रमाणे करावी. फॉर्म भरण्यासाठीची वेबसाइट व्यवस्थित नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. शहरातील झोपडपट्टीमध्ये ऑनलाइन व स्कॅनिंग सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धत बंद करून प्रत्यक्ष यापूर्वीसारखे अर्ज स्वीकारले जावेत. फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ लागतो. या कारणामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.’’