‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरू करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 
शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरू करा’
‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरू करा’

‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरू करा’

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः शहरात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी पुणे शहरात जावे लागते. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थचे उपकेंद्र शहरात सुरू करा, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाने केली आहे.
बार्टीच्या महासंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘शहरातील विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी आणि महिला यांना प्रशिक्षण, संशोधन तसेच लेखक व साहित्यिक यांना समतावादी विचाराचे साहित्याचे लेखन व साहित्य प्रकाशनाचे एक नवीन दालन सुरू होईल. त्यासाठी शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरू करावे. निवेदनावर मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मयूर जगताप यांच्या सह्या आहेत.