पिंपरीत शनिवारी धम्म मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत शनिवारी धम्म मेळावा
पिंपरीत शनिवारी धम्म मेळावा

पिंपरीत शनिवारी धम्म मेळावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता हिंदुस्थान ॲटोबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲड. प्रकाश आंबेडकर धम्म मेळाव्यात जनतेशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास राज्यातून अनुयायी येणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डी. व्ही. सुरवसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बौद्ध समाज विकास महासंघ, बानाई आणि अन्य संस्था, संघटना व बौद्ध विहारांच्या वतीने करण्यात आले आहे, असे सुरवसे यांनी सांगितले. बौद्ध विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, बानाईचे अध्यक्ष विजय कांबळे, देवेंद्र तायडे, शरद जाधव, अनिल सूर्यवंशी आदि उपस्थित होते. या मेळाव्यास राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, अंजली प्रकाश आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, रेखा ठाकूर, भिकाजी कांबळे, एस. के. भंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.