मोटारीची काच फोडल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीची काच फोडल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला
मोटारीची काच फोडल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला

मोटारीची काच फोडल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

मोटारीची काच फोडली; शेजाऱ्याचा प्राणघातक हल्ला

पिंपरी, ता. १३ : मोटारीच्या काच फोडल्याच्या कारणावरून एकाला रॉडने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली.
राजेंद्र विश्वासराव भोसले असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जगदीश जाधव, त्याची आई (रा. गुरुकृपा सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), मनोज जरे (रा.मोरे वस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी भोसले हे आरोपींचे शेजारी आहेत. जगदीशच्या मोटारीची काच भोसले यांनी दारूच्या नशेत फोडली. यामुळे जगदीश याच्या आईने त्यांना शिवीगाळ करून चप्पल फेकून मारली. तसेच मनोज यानेही मारहाण केली. तर जगदीश याने भोसले त्यांना जोरात लाथ मारल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यानंतर, जगदीश याने पुन्हा त्यांच्या डोक्यात रॉडने मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता जगदीशने ''तुला काय करायचे ते कर, माझे वरपर्यंत हात आहेत'' असे म्हणत दमदाटी केली.