सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई
सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राहुल उर्फ दगड्या बाबूराव टोणपे (वय २७, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई केली.
टोणपे याच्यावर २०१६ पासून आतापर्यंत पिंपरी, निगडी, चिंचवड व सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहून ही कारवाई करण्यात आली. त्याची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, या वर्षात पोलिसांनी मेहबूब दस्तगीर पटेल, दीपक सुरेश मोहिते व अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव या गुन्हेगारांवरही स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे.