पिंपरी दिवाळी लेख पिंपळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी दिवाळी लेख पिंपळकर
पिंपरी दिवाळी लेख पिंपळकर

पिंपरी दिवाळी लेख पिंपळकर

sakal_logo
By

अध्यात्म आणि विज्ञान

- आनंद पिंपळकर, ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ व ज्योतिषाचार्य

अध्यात्म आणि विज्ञान या मला नेहमी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हिंदू धर्मातील देवी, देवता, सण, वार, उत्सव, परंपरा, रीतिरिवाज या सगळ्यांचा विचार केला तर यातला दैवत किंवा कर्मकांडाचा भाग बाजूला काढला तरी या देवतांपासून ते कर्मकांडापर्यंत सर्वत्र विज्ञान ठासून भरलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

जसं की हिंदू धर्मामध्ये आदीदेवता म्हणून शिवाचा उल्लेख करतात. आता शिवाचा नीट अभ्यास केला तर त्याची रचना ही एखाद्या अणू सारखीच आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अशी या शिवाची रचना आहे. म्हणजेच शिव म्हणजे अणूची संरचना. अणू जसा मोठा स्फोट करू शकतो म्हणून त्याला अर्ध जागृतच ठेवला जातो. तो कायम अर्धोंमिलित असतो. तद्वत श्री शिवशंकर हे देखील अर्धोनमिलितच असतात. शिवलिंगाच्या अवतीभवती पाणी असते त्याच पद्धतीने आजकालच्या अणुभट्ट्या आपण पाहतो त्यांच्या अवतीभवती देखील पाणीच असते. कारण अणुभट्टीच्या रेडिएशनचा आजूबाजूला परिणाम होऊ नये. आता तुम्ही अणुभट्टीची रचना बघा ही रचना देखील शिवलिंगासारखीच असते.
एकंदरीतच काय तर या विश्वाची निर्मिती एका मोठ्या बिग बँगमुळे झाली. म्हणजेच या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये असे काही एकमेकांवरती ग्रह तारे वगैरे आदळले आणि त्यातून विश्वाची निर्मिती झाली यालाच शंकराचा तिसरा नेत्र उघडणे असं अध्यात्माने सांगितलं.
आता या शिवाचे अपत्य गणपती याच्या शरीर रचनेचा अभ्यास केला तर आपल्याला निर्विघ्न आयुष्य पार पाडायचं असेल तर ‘कसं जगायला हवं’ हेच सर्व ज्ञान गणपती आपल्याला त्याच्या अवयवांच्या रूपाने देत राहतो. मग हा गणपती विज्ञानाभिमुख कसा तर सध्या परदेशात काही संशोधन सुरू आहे. ब्रेनडेड झालेल्या माणसाचे शरीर आणि ज्याचे शरीर काम करत नाही, पण डोके काम करते, अशा माणसाचे डोके, असे दोन वेगवेगळे व्यक्ती एकत्र जोडण्याची प्रक्रिया विज्ञानाच्या आधाराद्वारे सुरू आहे. आता गणपतीचे रूप पाहिले तर मला असे वाटते की हे एक प्रकारे दोन वेगवेगळ्या जिवांना एकत्रित आणून पुनर्जीवित करण्याचेच विज्ञानाभिमुख गणित आहे.
विष्णू असेल, लक्ष्मी असेल, ब्रह्मा, नारद या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी सध्याच्या आधुनिक काळाशी ताळमेळ खात असतात. जनरेट, ऑपरेट आणि डिमालीश मिळून जीओडी म्हणजे गॉड मिळतो. स्थिती, उत्पत्ती आणि लय या तिन्ही विश्वाच्या स्थिती आहेत आणि या सर्व स्थितीच प्रातिनिधिक प्रभुत्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश याकडे आहे. या सर्व देवतांकडे तीव्र अशी अंतर्ज्ञानाची क्षमता आहे. म्हणजेच त्यांना डोळे बंद केले की दिसते, ऐकू येते असे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. तसे पाहिले तर सध्याच्या काळात आपणही फोन, टीव्ही, सॅटलाईट या माध्यमातून खूप काही गोष्टी जाणू समजून घेऊ शकतो.
महाभारतात संजय आणि धृतराष्ट्राला युद्ध मैदानावर काय चालले, हे महालात बसून सांगितले. आता यातला विज्ञान भाग समजायचा म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून हजारो मैल दूरवरच्या बातम्या आपण पाहतच असतो की आपण डोळे असून आंधळे असतो. परंतु, मीडिया मात्र त्या ठिकाणी संजयाची भूमिका निभावतो. आता महाभारताचा विषय निघालाच आहे तर कर्णाचा जन्म बघुयात.
कर्ण बिनापित्याचे अपत्य. आता काही काळापूर्वी हे सगळं धादांत अंधश्रद्धा वाटत होती. पण आता मात्र या गोष्टी प्रत्यक्षात ‘आईवीएफ’ वगैरेच्या माध्यमातून अवतरल्या आहेत. आता बिनाबापाचं किंवा बीना आईचे लेकरू देखील होऊ शकतं किंवा एकाच आई-बापाचं लेकरू दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्म घेऊ शकतं. आहे की नाही विज्ञानाची धमाल आणि अध्यात्माची कमाल. म्हणजे अध्यात्मात खोल शिरून पाहिले तर आपल्याला बऱ्याचदा असे लक्षात येईल की बरीच पौराणिक पात्र ही अशी तशीच वेगवेगळ्या पद्धतीने जन्माला आली आहेत. आहे का नाही अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड. खरंतर आताच मॉडर्न सायन्स हे प्राचीन स्पिरिच्युल सायन्सचीच एक छोटीशी शाखा आहे. आपले ब्रह्मवेद्य तत्त्ववेत्ते ऋषीमुनी म्हणजे सायन्टिस्टच होते. मला वाटतंय आधुनिक विज्ञानाने हे सगळे शोध या जुन्या सायन्सच्या आधारेच घेतले असावेत.

रावणाने विमानाने सीतेला पळवून नेले म्हणजे विमान तेव्हाही होते. मात्र, मॉडर्न सायन्सनी त्याचा प्रत्यक्षात आविष्कार केला. मग जर हे ऋषिमुनी सगळं करू शकत होते, तर त्यांनी सध्याच्या मॉडर्न सायन्सचे सगळे शोध चुटकीसरशी लावू शकले असते. परंतु त्यांना हे ठाऊक होतं की यामुळे ग्लोबल वॉर्मिंग किंवा अन्य अनेक गोष्टी वाढतील. ज्याचा पृथ्वीला वातावरणाला त्रास होईल. म्हणून कदाचित त्यांनी तसं केलं नाही. पण आपलेच काही सुशिक्षित या अद्भुत अशा अध्यात्माला अंधश्रद्धा समजतात. मात्र, परदेशातून वेगवेगळी नाव चिकटून आली. इंग्रजीमध्ये हे शास्त्र आम्हाला कोणी सांगितलं तर आम्हाला ते पटतं. परंतु आमचं पारंपारिक शास्त्र मात्र आम्हाला अंधश्रद्धाच वाटते. बांधकामापासून ते रोजच्या जीवनात निरोगी कसे राहावे, त्या औषधी शास्त्रापर्यंत आमच्या ऋषिमुनींची प्रगल्भता होती. ॲलोपॅथीचा शोध लागला मान्य आहे. पण त्याचबरोबर ॲलोपॅथी साइड इफेक्ट ही घेऊन आली आहे. चरकाने तर भूल देणे, ऑपरेशन करणे अशा गोष्टीही हजारो वर्षांपूर्वी केल्याचा आयुर्वेदात पतंजलीत उल्लेख आहे. या आयुर्वेदाचे संवर्धन व्हावे, यासाठीच त्यांनी झाडांना देवतांचा दर्जा देऊन त्यांचे पूजन करायला सांगितले. कधी कोणत्या झाडाचा उमरा बनवायला सांगितला, तर कधी कोणत्या झाडाखाली बसून भोजन करायला सांगितले. हे शास्त्र नीतिशास्त्र, आरोग्यशास्त्रावर न थांबता बांधकाम शास्त्रातही आमच्या पूर्वजांनी खूप जास्ती प्रगती केली होती. त्या काळातली मंदिरे पाहिली तर आताच्या आधुनिक हत्यारांना देखील इतकी जमेल का नाही माहीत नाही. कॉम्प्युटरचा शोध लागला असला तरी त्यालाही संगणक म्हणजे गणपतीच मानले आणि तोही बिचारा माऊसच्या आधारे चालतो म्हणजे आले का नाही पुन्हा अध्यात्म आणि विज्ञान.
बर आयुर्वेद राहू द्या! अगदी पैसा पण एवढा होता की सोन्याचा धूर निघायचा. आमच्या प्राचीन भारताचा जीडीपी जगाच्या एकूण जीडीपीचपैकी ६६ टक्के होता. चला तेही राहू दे! ही लोकं प्रचंड ज्ञानाचा सागर होती. आपल्या पुढच्या पिढीला ज्ञान मिळावे, यासाठी यांनी नालंदा, तक्षशिलासारखी अग्रगण्य विद्यापीठे देखील तयार केली. आधुनिक विज्ञान कितीही पुढे गेले. कितीही प्रगती केली. तरीसुद्धा परमेश्वर आणि निसर्गासारखा सायंटिस्ट व त्याच्याकडे असलेले सामर्थ्य, हे कोणत्याही माणसात किंवा सायंटिस्टमध्ये पुढील हजार वर्ष तरी निर्माण होईल, असे वाटत नाही. बरे तुम्ही विज्ञानाच्या आधारे कशावरही मात करा, या ईश्वराकडे आणखीन अशा काही गोष्टी असतात की ज्या त्याने निर्माण केल्यानंतर पुन्हा त्यावर सायंटिस्ट ना संशोधन करावे लागते. उदाहरणार्थ कोविड आणि विविध आजार. या मागे जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी रक्त बनविण्याचा भरपूर प्रयत्न केला. ‘फ्ल्युड’, ‘ब्लड सेल्स’ अशा अनेक गोष्टी बनवल्या. परंतु फक्त रक्तातच मिळणारा ‘free state Fe3+’ नाही तयार करता आला. तो कंपाउंड स्टेटमध्ये बनला. परंतु ‘फ्री स्टेट’मध्ये नाही बनवता आला. अखेर त्यांनी निष्कर्ष काढला की हा फक्त ‘ब्रह्मांडनिर्माता शास्त्रज्ञच’ तयार करू शकतो, आपण नाही. बरं हे शास्त्र इथे न थांबता पूर्वपार आकाशशास्त्राचा अभ्यासही आमच्या पूर्वजांनी केला. सध्या करोडो रुपयांच्या दुर्बिणी लावून सायंटिस्ट जे वागतात तेच आमच्या पूर्वजांनी पंचांगे बनवून सूर्यग्रहण हे चंद्रग्रहण सूर्योदय सूर्यास्त यांचे अचूक मार्गदर्शन केले. ज्योतिषशास्त्राच्या आधारे संपूर्ण जगावर होणारे बदल तसेच मानवी जीवनावर होणारे बदल यांचाही अभ्यास केला. गणिते मांडली.
एकूण काय तर, पृथ्वीवरील सर्व जिवांना सुखी करणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी अध्यात्मात शोधल्या म्हणजे सापडतील. फक्त खोलात शिरावं लागेल इतकंच. मॉडर्न सायन्स जिथे संपतं, तिथून स्पिरिच्युल सायन्स सुरू होतं. मात्र, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि हृदयात कोरून ठेवावी ती म्हणजे मॉडर्न सायन्सची जेवढी जास्त प्रगती होईल तेवढे जास्त माणसाला भोगावे लागतील. आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली आम्ही करत असलेली निसर्गाची हानी ही आमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पिढीला या सर्व गोष्टींची फार मोठी किंमत मोजावी लागेल, हे मात्र नक्की. विज्ञानाने तुम्हाला भौतिक सुख नक्की मिळेल. पण अध्यात्माने तुम्हाला आध्यात्मिक सुख मिळेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
---