महिलेची सोनसाखळी हिसकावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेची सोनसाखळी हिसकावली
महिलेची सोनसाखळी हिसकावली

महिलेची सोनसाखळी हिसकावली

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : पतीसोबत पायी जात असलेल्या महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या जाधववाडी येथील सिल्व्हर सिटी अपार्टमेंट समोरील रस्त्याने पतीसह जात असताना दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यापैकी मागे बसलेल्याने फिर्यादीच्या गळ्यातील ५१ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून आरोपी पसार झाले.