खासगी प्रवासी वाहनधारकांना सीटबेल्ट अनिवार्य हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी प्रवासी वाहनधारकांना 
सीटबेल्ट अनिवार्य हवा
खासगी प्रवासी वाहनधारकांना सीटबेल्ट अनिवार्य हवा

खासगी प्रवासी वाहनधारकांना सीटबेल्ट अनिवार्य हवा

sakal_logo
By

परिवहन खात्याच्या नवीन आदेशानुसार मागील सीटवर बसणाऱ्यांना सीटबेल्ट अनिवार्य केला आहे. मुंबई-पुणे, चिंचवड-मुंबई, वाकड-मुंबई, वाकड-कोल्हापूर, नारायणगाव-मुंबई, मंचर-मुंबई व अनेक ठिकाणी खासगी वाहनातून बेकायदा पद्धतीने प्रवासी वाहतूक सुरू आहे. दहा ते बारा प्रवासी या वाहनांतून दैनंदिन प्रवास करत असतात. त्यांना सीटबेल्ट अनिवार्य असायला हवा. वाहतूक विभागाकडून या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. वाहतूक विभागाला या खासगी वाहन व्यावसायिकांकडून दरमहा जी एन्ट्री असते त्यात वाढ होणार आहे का? परिवहन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने यावर त्यांनी खुलासा करावा.
- दिलीप डोळस, तळेगाव