परमार्थ, पराक्रम हातात हात धरून हवे - गोविंद महाराज गिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govind Maharaj Giri
परमार्थ, पराक्रम हातात हात धरून हवे रामजन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज गिरी यांचे प्रतिपादन

परमार्थ, पराक्रम हातात हात धरून हवे - गोविंद महाराज गिरी

देहू - संतपरंपरेची शिकवण परमात्मा आहे. परमार्थ आणि पराक्रम हातात हात धरून हवे. त्यामुळे राष्ट्र निर्माण होते. नुसता पराक्रम असेल तर ते राष्ट्र राक्षस बनेल. त्यामुळे पराक्रमाबरोबर परमार्थ हवा. पुढील पिढीच्या सुखासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करत आहेत, असे प्रतिपादन रामजन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज गिरी यांनी देहू येथे गुरुवारी (ता. २) केले.

येत्या १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात येत आहेत. लोकार्पण सोहळ्यानंतर देहूतील माळवाडी येथील लष्कराच्या भव्य पटांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवाद सोहळ्याच्या मंडपाचे भूमिपूजन गोविंद महाराज गिरी, ज्येष्ठ कीर्तनकार मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गिरी महाराज बोलत होते.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, तुषार भोसले, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, रसिका काळोखे, प्रकाश महाराज झंजवाळ, लेफ्टनंट कर्नल भूपेंद्र सागी, शिवाजी महाराज मोरे आदी उपस्थित होते. या वेळी जालिंदर काळोखे यांनी सूत्रसंचालन केले तर पंकज गावडे यांनी आभार मानले.

असा असेल सभा मंडप

संवाद सभेच्या ठिकाणी चाळीस हजार वारकरी, भाविक यांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. लोकांना सभा पाहता यावी यासाठी ध्वनिक्षेपक व्यवस्था व १० एलईडी स्क्रिनची व्यवस्था असणार आहे. पार्किंगची व्यवस्था एक किलोमीटर अंतरावर असणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, बाळा भेगडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01896 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dehuPower
go to top