शिक्षकांच्या समस्या काही सुटेनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher
शिक्षकांच्या समस्या काही सुटेनात

शिक्षकांच्या समस्या काही सुटेनात

पिंपरी - महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दर महिन्याला कर्मचारी तक्रार निवारण दिन सुरू केला आहे. त्याअंतर्गंत शिक्षकांनी समस्या मांडल्या होत्या. मात्र, सहा महिने उलटून गेले तरी समस्या अद्याप सोडवल्या नाहीत. त्या कार्यवाहीचा संगणकीय अहवाल कामगार कल्याण विभागाकडे पाठविण्यात नसल्याचे समोर आले आहे.

महापालिका कर्मचाऱ्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना पेन्शन, धन्वंतरी योजना, कामगार कल्याण निधीचे सभासद केले नाही. अनेक शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. विविध कर्ज मिळत नसल्याचे खदखद काही शिक्षकांनी बोलून दाखवली. बहुतांश शिक्षक शिक्षण विभागाचे नाव उंचविण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि प्रशासनाचा त्या शिक्षकांना त्रास होत असेल किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करूनही अन्याय सहन करावा लागत आहे. वारंवार प्रयत्न करूनही शिक्षकांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. या प्रशासनाच्या परिपत्रके अन्वये कर्मचारी म्हणून कर्मचारी तक्रार निवारण दिन अंतर्गत काही शिक्षकांनी अर्ज दिले होते. परंतु या कर्मचारी तक्रार निवारण दिल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित विभागांना आदेश दिले होते. आदेश देऊनही अद्याप सहा महिने झाले तरी कोणतीही कार्यवाही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. नियमित शिक्षक कर्मचाऱ्यांना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून त्यावर गांभीर्य नाही, कार्यवाही अथवा कोणतीच प्रक्रिया, निर्णय नाही तसेच या कर्मचारी तक्रार निवारण दिनानंतर त्याचा कार्यवाहीचा संगणकीय अहवाल कामगार कल्याण विभागाकडे पाठविण्यात ही आलेला नाही.

शिक्षकांना संधी द्या

शिक्षणाधिकारी यांनी ‘संवाद दिन’ फक्त खासगी शाळांतील शिक्षकांसाठी आयोजित केला आहे. यात महापालिका शिक्षक यांना संधी दिली असती तर समस्या मांडल्या असत्या. स्वतः पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षकांच्या बऱ्याचशा समस्या अडचणी आहेत. परंतु संवाद दिन फक्त खासगी शाळांतील शिक्षकांसाठी असल्यामुळे महापालिका शिक्षकांचे वाली कोण? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

प्रामाणिकपणे कामकाज करूनही शिक्षकांना काही महत्त्व न देता डावलले जाते. त्यामुळेच शिक्षक कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे. तसेच शिक्षण विभाग प्रशासनाचा उदासीनतेचा चेहरा शिक्षकांसमोर येत आहे. याचा प्रत्यय व अनुभव जवळपास सर्वच शिक्षकांना येत आहे.

- मनोज मराठे, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना

पाच महिन्याच्या कालावधीत विविध विभागातून ३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १८ तक्रारींचे निरसन केले आहे तर १४ तक्रारी निरसन करण्यासारख्या नाहीत. उर्वरित तक्रारीसाठी संबंधित विभागांकडून अभिप्राय अद्याप मिळालेला नाही.

-प्रमोद जगताप, कामगार कल्याण अधिकारी, कामगार कल्‍याण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01917 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top