‘टीडीआर’ व्यवहारांची जीएसटीकडून तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टीडीआर’ व्यवहारांची 
जीएसटीकडून तपासणी
‘टीडीआर’ व्यवहारांची जीएसटीकडून तपासणी

‘टीडीआर’ व्यवहारांची जीएसटीकडून तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः राज्य सरकारच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने शहरातील ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स अर्थात हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर) खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती महापालिकेकडे मागितली होती. मात्र, त्यातील काही बांधकाम व्यावसायिकांचे पॅनकार्ड नसल्याने त्यांनी जीएसटी भरली की नाही, याबाबत माहिती मिळत नव्हती. त्यामुळे जीएसटी विभागाचे एक पथक गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेत तळ ठोकून असून सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या फाईलींची तपासणी करत आहेत. तसेच, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या जागा खरेदी-विक्री व्यवहारांची देखील तपासणी केली जाणार आहे. याबाबत शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या जीएसटी विभागाचे पथक टीडीआर खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी करीत आहे. त्यातून कोणी जीएसटी भरलेला नाही, याची माहिती मिळणार आहे.’’
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02174 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top