अपहारप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहारप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
अपहारप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

अपहारप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पत्नीला मारहाण व जिवे मारण्याची धमकी देत दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सुधाकर पाटील (वय ४६, रा. वाकड), मंगला सुधाकर पाटील (वय ६६), सुधाकर पंडितराव पाटील (वय ७६, दोघेही रा. गोरेगाव, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १६ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची भांडी एसबीआय बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. दरम्यान, फिर्यादीचे पती विशाल यांनी बँकेतून परस्पर काढून घेत त्याचा अपहार करीत फिर्यादीला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून फिर्यादीस त्यांच्या राहत्या घरातून बाहेर हाकलून देत घरात येण्यास मज्जाव केला. तसेच आरोपीने लग्न झाल्यापासून माहेराहून पैसे आण म्हणून फिर्यादीला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. फिर्यादीचा लॉगिन आयडी व पासवर्ड घेऊन पगार परस्पर काढून घेतला. फिर्यादीच्या मुलांनाही मारहाण केली. वेळोवेळी फिर्यादीच्या गुगल पे नंबरवरुन त्याच्या गुगल अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर केले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02552 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top