
निसर्गसंवर्धनासाठी मोफत रोपे
पर्यावरण दिन
--
निसर्गराजासाठी राबताहेत मित्र जीवांचे
पिंपरी, ता. ४ : क्रिकेट खेळताना त्यांच्या मनात निसर्ग संवर्धनाचा विचार आला. रायगडावर जाऊन शपथ घेतली. तेथील झाडांच्या बिया गोळा करून रोपे बनविली आणि ‘निसर्गराजा मित्र जीवांचे’ संस्था साकार झाली. या माध्यमातून ते तरूण १३ वर्षांपासून निसर्ग व पर्यावरण संवर्धन करीत आहेत.
सुरुवातीस दुधाच्या रिकाम्या पिशव्या वापरून रोपे केली. देहूरोडच्या दत्त मंदिर परिसरात पहिल्यांदा शंभर रोपे लावली. ती जगवली. त्यांना किवळे येथील सुजाता व मुकुल दत्तानी या दाम्पत्याची साथ मिळाली. त्यांचे फार्महाऊस नर्सरीसाठी दिले. मोफत रोपवाटिका सुरू झाली. देशी झाडांची रोपे उपलब्ध केली. वृक्षारोपणासह नदी व घाटांची स्वच्छता केली. कलेढोन (ता. खटाव), हिवरे (ता. पुरंदर), उदाचीवाडी (ता. पुरंदर), वडगाव हवेली (ता. कराड) आदी ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे जगवली. मारुंजी येथे अकेमी एजुकेशन सोसायटीच्या सहकार्याने अमलताश रोपवाटिका लोकसहभागातून सुरू केली. पशु-पक्षांसाठी पाणवठ्यांची व पक्ष्यांसाठी धान्याची सुविधा केली. ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ विषयावर राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा गेऊन जनजागृती केली. पुणे परिसरातील काही शाळा, महाविद्यालयांत रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. निसर्ग संवाद उपक्रम राबविला जातो. उन्हाळ्यात झाडे, पशू, पक्षींना अन्न आणि पाणी मिळावे यासाठी एप्रिल कुल स्पर्धेचे आयोजन केले जाते.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02796 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..