भोसरीत महिलेला मारहाण करीत विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत महिलेला मारहाण करीत विनयभंग
भोसरीत महिलेला मारहाण करीत विनयभंग

भोसरीत महिलेला मारहाण करीत विनयभंग

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : महिलेला मारहाण करीत अश्लील बोलून छेड काढल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली. हा प्रकार भोसरी येथे घडला.
याप्रकरणी पीडित २८ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय यादव कानडे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) व सागर मारुती हिवरे (वय २१, रा. दिघीरोड, संत तुकारामनगर, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिला गुरुवारी (ता. २) रात्री पावणे दहाच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावरून जात असताना आरोपी तिथे आले. ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’, असे महिलेला विचारले. त्यावर नको दादा म्हणत महिला दुसऱ्या रिक्षाकडे गेल्या. आरोपींनी पुन्हा तिथे जात मी सोडू का, असे महिलेला म्हटले. त्यावर महिला नको म्हणाली. तरी, देखील आरोपी ऐकत नसल्याने महिलेने आरोपीला मारण्यासाठी हात उगारला असता आरोपीने तिचा हात जोरात दाबला. यात महिलेच्या हाताला खरचटले. त्यानंतर महिलेच्या पोटात लाथ मारली. अश्लील भाषेत बोलले. दरम्यान, तेथे आलेला महिलेचा भाऊ हात सोडून घेऊ लागला असता आरोपींनी भावालाही डोक्यात दगड मारुन जखमी केले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02867 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top