
रिव्हर प्लॉगेथॉन ः महापालिका व सामाजिक संस्थांतर्फे आयोजन तब्बल १० टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन
पिंपरी, ता. ५ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका व विविध सामाजिक संस्थांतर्फे आयोजित रिव्हर प्लॉगेथन मोहिमेत सुमारे दहा टन कचरा मुळा, पवना व इंद्रायणी नदी परिसरातून जमा करून नष्ट करण्यात आला.
चिखली गावठाण इंद्रायणी नदी पात्र परिसरात विकास अनाथ आश्रम व जनवाणी संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबवली. फ क्षेत्रीय कार्यालय सहायक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांनी ‘कापडी पिशव्यांचा वापर करावा,’ यासंबंधी गीत सादर केले. जनवाणी संस्थेच्या पर्यवेक्षकांनी स्वच्छतेचा संदेश दिला. ६४० किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला. आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, अमोल गोरखे, महेंद्र साबळे, अमित पिसे, विकास अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष विकास साने, जनवाणी संस्था प्रकल्प प्रमुख मंगेश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते अमृत सोनवणे, दिनेश यादव, जितुभाऊ यादव, विजय काटे, दिनेश कदम, ऋषिकेश सांडभोर, सखाराम धोत्रे, कॉनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरातून तीन टन कचरा संकलित केला. भैरवनाथ मंदिर परिसर स्वच्छता मोहीम राबवली. प्लॅस्टिक वापरणार नसल्याबाबत व पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. माजी महापौर राहुल जाधव, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, गणेश मोरे, बी. बी. कांबळे, वैभव कांचन आदी सहभागी झाले. मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी लगत प्लॉगेथॉन मोहीम राबविली. चिखली सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगडे, एसएनबीपी शाळेचे सुमारे तीनशे विद्यार्थी, सिटी प्राइड शाळेचे शिक्षक, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
ग प्रभागात प्लॉगेथॉन
वाकड ः महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग २१, २३, २४ व २७ मधील परिसरात रिव्हर प्लॉगेथॉन राबवली. काशिबा शिंदे सभागृह नदी लगतचा परिसर, थेरगाव स्मशानभूमी नदी लगतचा परिसर, केजुदेवी घाट नदी लगतचा परिसर, रहाटणी गावठाण नदी लगतचा परिसर आदी ठिकाणी मोहीम राबवली. सहायक आयुक्त रविकिरण घोडके, अभिजित हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरोग्य अधिकारी राजू बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, संबंधित प्रभागाचे आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, सतीश इंग्गेवाड, सुरेश चण्णाल, शुभम कुपटकर, सामाजिक कार्यकर्ते राकेश भानुसे, मिलिंद राजेभोसले आदी सहभागी झाले होते.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02949 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..