बेकायदा होर्डिंगने शहर बकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा होर्डिंगने शहर बकाल
बेकायदा होर्डिंगने शहर बकाल

बेकायदा होर्डिंगने शहर बकाल

sakal_logo
By

बेकायदा जाहिरातींच्या होर्डिंगने शहराला बकाल केले आहे. होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिटसाठी मानक प्रक्रिया नाही. पावसाळ्यात होर्डिंग कोसळल्यावर नागरिक आणि वाहनचालकांना धोकादायक ठरू शकतात. शहरात एकही होर्डिंग परवानगी न घेता लावले आहेत. राजकीय व्यक्ती आणि खासगी जागामालकांच्या कृपेने मलई खाल्ली जात आहे. त्याला प्रशासनही जबाबदार आहे. सुमारे तीनशेच्यावर होर्डिंगचा काळाबाजार गेली अनेक वर्षे चालू असून याला आळा बसला नाही. समन्वयक आणि नोडल अधिकारी गेली २० ते २५ वर्षांपासून नक्की काय करतात? शहरातील लहान-मोठे लोखंडी होर्डिंग नगरपरिषदेच्या परवानगी शिवाय उभी कशी राहिली? आत्तापर्यंत या होर्डिंगपासून मिळणारे उत्पन्न जागामालक घेत असताना पालिका प्रशासनाने मालमत्ता करात वाढ केली नाही. संबंधित समन्वयक आणि नोडल अधिकारी यांना पाठीशी घालून प्रशासनाचे उत्पन्न स्वतःच्या खिशात घालणारे कोण आहेत? या सर्व अनधिकृत होर्डिंगला वीजपुरवठा करणारे अधिकारी कोण आहेत? सामाजिक बांधकाम खात्याच्या जागेवर असलेल्या होर्डिंगला जबाबदार त्याच खात्याचे लाचखोर अधिकारी आहेत. शहर हद्दीतील अनधिकृत होर्डिंगला शहराचे मुख्याधिकारीच जबाबदार आहेत. या होर्डिंगपासून सनदशीर मार्गाने स्थानिक प्रशासनाला करोडो रुपये उत्पन्न मिळाले असते. परंतु, जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी खिसे भरले. पाच सहा कामगारांना जीव गमवावा लागला. अनेकांना अपंगत्व आले. परंतु, ना दाद ना फिर्याद. याविषयी आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक मूग गिळून गप्प राहिले आहेत.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02952 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top