पदपथावरील अतिक्रमणे काढा महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावरील अतिक्रमणे काढा
महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी
पदपथावरील अतिक्रमणे काढा महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

पदपथावरील अतिक्रमणे काढा महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ज्या शाळांजवळ पदपथ आहेत, तिथे रस्ता आणि पदपथ यांच्यामध्ये संरक्षक ग्रील किंवा जाळ्या बसवाव्यात. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरू करावेत. पदपथांवरील अतिक्रमण काढावीत. नाले बुजवून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.
शहरातील नागरिक व प्रशासनात सुसंवाद राखणे, तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारी (ता. ६) आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा झाल्या. त्यात १२७ नागरिकांनी तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे २४, १३, ७, ११, १३, १४, २७ आणि १८ अशा तक्रारी मांडण्यात आल्या. सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, उपआयुक्त अजय चारठणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी ठरत असल्याने त्या बंद करू नका, त्यात दाखल तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचनाही नागरिकांनी मांडल्या. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पाळीव प्राण्यांबाबत परवाना आवश्यक आहे. याबाबतच्या कोणत्याही नियमावलीचे पालन न करता प्राणी पाळले जातात. संबंधितांना प्राणी पालनाबाबतच्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी सूचनाही मांडण्यात आली.

तक्रारींबाबत नागरिकांच्या मागण्या
रस्त्यांचे डांबरीकरण करावे,
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावेत
दशक्रिया घाटांची दुरुस्ती करावी,
उद्यानांचे अर्धवट काम पूर्ण करावे
रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना पाणी व सुशोभिकरणाकडे लक्ष द्यावे
पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा,
रस्त्यावरील राडारोडा हटवावा
अभ्यासिका उभाराव्यात,
स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नियमित पाठवावे
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03412 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top