गुन्हे वृत्त पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त 
पोलिसात तक्रार दिल्याने 
तरुणावर प्राणघातक हल्ला
गुन्हे वृत्त पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला

गुन्हे वृत्त पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : भावाच्या टेंपोचे नुकसान केल्याची पोलिसात तक्रार दिल्याने महिलेच्या भावावर दोघांनी कोयता, तलवारीने वार करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना देहूरोड येथे घडली.
कुणाल सकट, संतोष नागेश आण्णामले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अंजुम रहीस रंगरेज (रा. पंडित चाळ, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी अंजुम यांच्या भावाच्या टेंपोचे नुकसान केले. यामुळे अंजुम यांनी त्यांच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी अंजुम यांचा भाऊ मुसरफ रशीद रंगरेज याला कोयत्याने डोक्यात मारले. संतोष याने मानेवर तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अंजुम व त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
------------------------

दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना भोसरी पोलिसांनी अटक केली तर त्यांचा एक साथीदार पसार झाला. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई भोसरीतील गावजत्रा मैदान येथे करण्यात आली.
निहाल संजय हुवाळे (वय २३, रा. भेकराईनगर, हडपसर), राहुल संजय पांचाळ (वय २०, रा. पांडवनगर १, चक्रपाणी वसाहत भोसरी), महादेव बाळू जाधव (वय २३, रा. मगरपट्टा, हडपसर, मूळ-उस्मानाबाद ), मयूर गुलाब काकडे (वय २०, रा. तुपेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर अभय ऊर्फ अभि गायकवाड (रा.भेकराई बस स्थानकाजवळ, हडपसर) असे पसार आरोपीचे नाव आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानात काहीजण थांबले असून, ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. आरोपींकडून एक लाख २० हजारांच्या दोन दुचाकी, दोन कोयते, चार मास्क, मिरची पूड, चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
------------------------

निगडीत सोनसाखळी हिसकावली

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली. ही घटना प्राधिकरण, निगडी येथे घडली.

याप्रकरणी द्रौपदी नामदेव पाटील (वय ६५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शनिवारी (ता. ४) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २४ मधील रस्त्याने पायी घरी जात होत्या. एका दुचाकीवरून दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवले. दरम्यान, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने द्रौपदी यांच्या गळ्यातील ६५ हजारांची सोनसाखळी हिसकावली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------

अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना वाकड येथे घडली.
संजय उद्धव जाधव (रा. मांगडेवाडी,पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने महिलेला व्हाट्सअ‍ॅपवर वारंवार अश्लील मेसेज पाठवले. व्हिडिओ कॉल करून त्यांना भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली.
------------
मारहाण करून विवाहितेचा छळ

गरोदरपणात विवाहितेवर औषधोपचार न करता तिला मारहाण करून
तिचा छळ केला. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पती अंकुश उत्तम आगलावे (वय २९, रा. खारघर, पनवेल), सासू अहिल्याबाई उत्तम आगलावे (वय ५०), सासरा उत्तम आगलावे (रा. परभणी), नणंद अनिता राजकिरण कोकाटे (वय २८, रा. ढोकी, उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मारहाण केली. गरोदरपणात औषधोपचार न करता तिच्या वडिलांना, भावाला मारहाण केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी, चिंचवड, परभणी, पनवेल येथे घडला.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03461 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top