तब्बल ५८० विद्यार्थ्यांना मदतीचा हात नववीत शिकणाऱ्या दोघांकडून स्टेशनरी साहित्य व नोटबुक्स भेट ५८० विद्यार्थ्यांना अनोखी मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ५८० विद्यार्थ्यांना मदतीचा हात
नववीत शिकणाऱ्या दोघांकडून स्टेशनरी साहित्य व नोटबुक्स भेट 
५८० विद्यार्थ्यांना अनोखी मदत
तब्बल ५८० विद्यार्थ्यांना मदतीचा हात नववीत शिकणाऱ्या दोघांकडून स्टेशनरी साहित्य व नोटबुक्स भेट ५८० विद्यार्थ्यांना अनोखी मदत

तब्बल ५८० विद्यार्थ्यांना मदतीचा हात नववीत शिकणाऱ्या दोघांकडून स्टेशनरी साहित्य व नोटबुक्स भेट ५८० विद्यार्थ्यांना अनोखी मदत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः शालेय जीवन म्हणजे आयुष्यातील सुवर्णकाळ. विद्यार्जनासोबतच सवंगड्यांसोबत आनंदानं भरलेला व भारलेला. निर्मळ व स्व‍च्छंदी. अशा वयात विद्यार्थ्यांकडून स्वयंप्रेरणेने एखादं चांगलं काम घडलं तर शिक्षकांसह पालकांसाठीही अभिमानाची बाब. असंच अभिमानाचे व कौतुकास्पद कार्य इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या राजवीर जाधव व रोनीत लाहोटी यांनी केलं आहे. साधू वासवानी मिशनच्या ‘शेअर टू केअर’ उपक्रमांतर्गत त्यांनी बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या ५८० विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्य व नोटबुक्स भेट दिल्यात.
डॉ. मिनू मेहतानगर सोशल सर्व्हिस सेंटर, शांताई व महिला सेवा मंडळ या संस्थांतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य शिक्षणसाधनं गरजूंपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रोनीत आणि राजवीर यांची शाळकरी मित्रांच्या मदतीला धावून जाण्याची कृती अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद असून, त्यांच्यापासून कल्पना घ्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. ‘निस्वार्थ सेवा’ ही नेहमीच साधू वासवानी मिशनचा गाभा राहिली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व अध्यात्मिक समाज जीवनाशी निगडित सेवा मिशनच्या कार्याचा भाग आहे. इतरांवर प्रेम करण्यासाठी माणसांमध्ये आध्यात्मिक अभिमुखता निर्माण करणे, यावर मिशनचा भर असतो. कुमारवयीन विद्यार्थ्यांशी भावनिक बंध जोडणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीमध्ये प्रेम, एकमेकांत वाटून घेण्याची भावना आणि एकमेकांची काळजी घेण्याचे संस्कार रुजविण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. रोनीत-राजवीर यांनी स्वयंप्रेरणेतून ही कृती केली. अशा प्रकारचे कार्य पुढेही चालू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यांच्या हातून भविष्यकाळात, अशी अनेक चांगली कामे होतील, यात संशय नाही, असे मिशनने कळविले आहे.
--
फोटो ः 69345

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03477 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top