सांगवी गावात शिवस्मारक उभारण्याबाबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवी गावात शिवस्मारक उभारण्याबाबत
सांगवी गावात शिवस्मारक उभारण्याबाबत

सांगवी गावात शिवस्मारक उभारण्याबाबत

sakal_logo
By

वाचक लिहितात

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, इतिहास, पराक्रम हा आपल्या सर्वांना प्रेरक आहे. त्यांच्या विचारांचा चरित्राचा प्रसार व्हावा आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जास्तीत जास्त समजावे. या महापुरुषांची महती अनेकांपर्यंत पोहचावी या व्यापक उद्देशाने, सांगवी गावात शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी कुंदन शेषराव कसबे यांनी ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत केली. सांगवी गावात खूप मोठी लोकवस्ती आहे. गावातील तरुण व स्थानिक नागरिकांची देखील बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे. या सांगवी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार शितोळे कुटुंब यांचे वंशज यांचे आजही वास्तव्य आहे. तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरक्षित भूखंड ३४१ येथे मोकळी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक उभारण्यात यावे जेणेकरून महापालिकेच्या माध्यमातून शहराला व सांगवी गावाला एक नवी ओळख देखील निर्माण होईल.
-कुंदन शेषराव कसबे, सांगवी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03515 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top