जैन संघटना विद्यालयात विद्यार्थिनींची वाचन प्रेरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन संघटना विद्यालयात विद्यार्थिनींची वाचन प्रेरणा
जैन संघटना विद्यालयात विद्यार्थिनींची वाचन प्रेरणा

जैन संघटना विद्यालयात विद्यार्थिनींची वाचन प्रेरणा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः ‘‘वाचनाने माणसाचे आयुष्य समृद्ध होते. पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अर्थात ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालय व माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात कानडे बोलत होते. प्राचार्य दिलीप कुमार देशमुख, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, मुख्याध्यापक संजय जाधव, प्रा. प्रतिभा ढोकरे, बाबासाहेब शिंदे, प्रा. गौरी जाधव, प्रा. शीतल भापकर, प्रा. वैभव केसकर आदी उपस्थित होते. कानडे यांनी, ‘हे माणुसकीचे नाते जोडीत मी निघालो, अंधार जरा थोडासा उजळीत मी निघालो’ व ‘आईची आय शिवमाय’ या कविता मुलांसमोर सादर केल्या. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे यांनी प्रास्ताविक केले. अनुष्का काकडे या विद्यार्थिनीने ‘वाचनाचे महत्त्व व त्यामुळे होणारे संस्कार’ या विषयावर भाष्य केले. सृष्टी कांबळेने पाठ्यपुस्तकातील उताऱ्याचे अभिवाचन केले. पुस्तक भेट देऊन त्यांना गौरविले. वैशाली खुर्पे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रतिभा ढोकरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ग्रंथपाल नितीन जाधव यांनी आभार मानले.