पिंपरीतील व्यापाऱ्यांची आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील व्यापाऱ्यांची आज बैठक
पिंपरीतील व्यापाऱ्यांची आज बैठक

पिंपरीतील व्यापाऱ्यांची आज बैठक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : शहरातील व्यापारी हे निरनिराळ्या वाहतूक समस्या आणि पथारी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे त्रस्त झाले आहेत. दिवाळीपूर्व खरेदीसाठी पिंपरी कॅम्प व शहरातील अन्य बाजारांमध्ये गर्दी होत असताना पोलिसांच्या पार्किंग कारवाईमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही त्रास होत आहे. या अडचणींवर चर्चा करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी (ता.१८) सकाळी ११ वाजता पिंपरी कॅम्पमधील बी. टी. आडवाणी (उबाडा) धर्मशाळेत सर्व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांच्या दारात पथारी आणि फेरीवाले अतिक्रमण करून व्यापाऱ्यांवरच दादागिरी करत आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी नेमलेले पथक निष्क्रीय ठरले आहे. या अतिक्रमणाबाबत तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यावरच पोलीस कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे, या बैठकीला सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.
या बैठकीस व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक शाखेचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत, असे पिंपरी मर्चंट फेडरेशनचे महेश मोटवानी, नीरज चावला, प्रकाश पमनानी यांनी कळविले आहे.