पिंपरीत जेष्ठ नागरिक संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत जेष्ठ नागरिक संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
पिंपरीत जेष्ठ नागरिक संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात

पिंपरीत जेष्ठ नागरिक संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात इ.दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडास्पर्धेतील विजेत्या महिला व पुरुष यांना माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी दुडय्या स्वामी होते. सामाजिक कार्यकर्ते उदय वासरे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले. यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका निकिता कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण बाग, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, बाळकृष्ण माडगुळकर, शांताराम सातव, गजानन ढमाले, ईश्वर चौधरी, विभागीय उपाध्यक्ष तसेच सल्लागार पंडीत खरात, पिंपरी संघाचे अध्यक्ष दत्तोबा नाणेकर उपस्थित होते. यावेळी महिला भजनी मंडळांनी भजने सादर केली. संस्थेचे सचिव अशोक कु‌दळे यांनी अहवाल वाचन केले. कार्याध्यक्ष सुधाकर यादव यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष वसंत तावरे यांनी वार्षिक जमाखर्चाचे वाचन केले. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सुब्रतो मुजुमदार, उदय वाघेरे यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. कल्पना देशमुख, भूपाल किविल यांनी मार्गदर्शन केले. कैलास भुजबळ यांनी आभार मानले.