
फ्रेंड्स क्लबचा रायगड ट्रेक
पिंपरी, ता. १८ : फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा ३३वा ट्रेक शनिवारी (ता. १५) रोजी किल्ले रायगड या ठिकाणी पार पडला. ट्रेकमध्ये ५० लहान-मोठ्या अबालवृद्ध सदस्यांनी भाग घेतला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचा निनाद करून रायगडाच्या पायथ्यापासून ट्रेकिंगला सुरुवात झाली.
फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून ट्रेक व सुरक्षिततेच्या सर्व सूचनांचे मार्गदर्शन केले. हिरवीगार शाल पांघरून लांब पसरलेले डोंगर, पावसात उगम पावणारे लहान-मोठे धबधबे व नागमोडी वळणे पार करत पायऱ्यांच्या वाटेने शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी रायगड चढण्यास सुरुवात केली.
मोहिमेमध्ये बजाज ऑटोचे डेप्युटी जनरल मॅनेजर सुनील विंचू, भाऊसाहेब गरुड, ध्रुव विनीत जयस्वाल यावेळी उपस्थित होते. ट्रेक लीडर म्हणून जयसिंग कांबळे, कालिदास सूर्यवंशी, लहू टाव्हरे, शंकर लंगोटे, सुधाकर मकासरे, विशाल चौगुले यांनी या मोहिमेमध्ये मोलाचे सहकार्य केले.