प्रेताची अदलाबदल हा गैरव्यवहारच ः कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेताची अदलाबदल हा
गैरव्यवहारच ः कदम
प्रेताची अदलाबदल हा गैरव्यवहारच ः कदम

प्रेताची अदलाबदल हा गैरव्यवहारच ः कदम

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) प्रेताची अदलाबदल होणे म्हणजे बेजबाबदार अधिकाऱ्यांचा गैरकारभारच आहे. या कृत्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी जाहीर निषेध केला आहे.
वायसीएम रुग्णालयातील ही घटना बुधवारी (ता. १९) उघडकीस आली असली तरी मागील तीन वर्षांपासून मनुष्याचे प्रेत प्लास्टिक पेपरने संपूर्ण बंद करून नातेवाइकांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी दिली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचेच प्रेत देत असतील का याबाबत संशय वाढला आहे. सरकारी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण व खासगी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण जर पाहिले तर हे लक्षात येते की, शासकीय रुग्णालयातील कारभाराची उदासीनता प्रचंड आहे. महापालिका विभागातील रुग्णालयातील रुग्णसेवेची दरवाढ दीडशे टक्के केली आहे. सुविधांच्या नावाने नागरिक ओरड करतात, याची जाणीव प्रस्थापित राजकारण्यांना नाही.
गलेलठ्ठ पगार घेऊन अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागतात. नातेवाइकांना उद्धटपणे बोलले जाते. काही विचारले की काय माहिती, कोणास ठाऊक, ही उत्तरे येतात. अशा अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणे गरजेचे आहे. वायसीएम रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाची कसून चौकशी झाली पाहिजे व हे कृत्य ज्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली व कर्मचाऱ्याकडून झाले आहे, त्याला तत्काळ निलंबित करा. अन्यथा, संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.