मुले पळविणाऱ्या टोळीबाबत तातडीने कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुले पळविणाऱ्या टोळीबाबत तातडीने कारवाई करा
मुले पळविणाऱ्या टोळीबाबत तातडीने कारवाई करा

मुले पळविणाऱ्या टोळीबाबत तातडीने कारवाई करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : मागील महिन्यात सोशल मीडियावर लहान मुलांना पळविणाऱ्या टोळीचे काही व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा तातडीने तपास सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.
सामाजिक माध्यमांवर हे सर्व व्हिडिओ व फोटो राज्याबाहेरील होते, असे दिसते. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील खेड तालुक्यातील आवशी गुंडेफाटा येथे पहाटे दीड दरम्यानचे घटनेचे व इतरही शक्य तितके फोटो व व्हिडिओ ई-मेल सोबत जोडले आहेत. पोलिस कंट्रोल रूमच्या व्हाट्सअप नंबरवर ही हे सर्व फोटो व व्हिडिओ पाठवीत आहे, असे गोडांबे यांनी पाठविलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे.

‘‘राज्य पोलिसांनी मुले पळविण्याच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन माध्यमात निवेदन द्यावे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर्स किडनी रॅकेटमध्ये सामील असल्याबाबत माध्यमात बातम्या आल्या होत्या, अशा आणखी कोणत्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर्सचे या अवयव तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधित आहेत का, याचाही तातडीने तपास सुरू करावा.’’
- ॲड. सचिन गोडांबे, सामाजिक कार्यकर्ते, भोसरी.