नेरेत जागेच्या वादातून तरुणावर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरेत जागेच्या वादातून तरुणावर गोळीबार
नेरेत जागेच्या वादातून तरुणावर गोळीबार

नेरेत जागेच्या वादातून तरुणावर गोळीबार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : नेरेतील दत्तवाडी येथे जागेच्या वादातून गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला. तर त्याचे वडील, चुलते व चुलत भाऊ यांना बेदम मारहाण करण्यात आली.
येशू लुटेरा मारवाडी (वय २८, रा. शिव कॉलनी, नेरे, दत्तवाडी ) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास राजपूत (रा.भोसले वस्ती, माण), कार्तिक ठाकूर (रा.आकुर्डी), पृथ्वीराज राठोड (रा.चाकण), ज्ञानेश्वर राजपूत (रा.वाडेबोल्हाई ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जागेच्या वादामधून फिर्यादीचा चुलत पुतण्या विकास हा इतर आरोपींसह फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादीसह त्यांचे चुलते नागू मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादी त्यांना समजविण्यासाठी जात असताना विकास याने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या हाताला घासून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर, फिर्यादी हे स्वतःला वाचविण्यासाठी घरात लपले असता इतर आरोपींनी फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ व वडीलांना दगड मारले. तसेच आरोपी विकास याने पुन्हा घराजवळ येऊन पत्र्याच्या शेडवर गोळी झाडली. त्यानंतर, फिर्यादी यांना ''आता वाचलास , तुला माहित आहे का ? माझ्यावर किती गुन्हे आहेत, पुन्हा सोडणार नाही'' अशी धमकी दिली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.