‘घरकुलमधील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘घरकुलमधील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्या’
‘घरकुलमधील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्या’

‘घरकुलमधील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्या’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये जनसंवाद सभेमध्ये घरकुलमधील समस्येविषयी सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी तक्रार केली. या जनसंवाद सभेमध्ये ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. घरकुल मध्ये ‘सी’ इमारतीकडे भामा आसखेड पाण्याची जलवाहिनी टाकली गेली. त्या भागातील रस्त्याची पूर्ण चाळण झाली होती. या रस्त्यावर खड्डे व पाणी साठून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत सभेमध्ये मगर यांनी तक्रार केली. यावर अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसांमध्ये पाण्याची तपासणी झाल्यानंतर सर्व रस्ते दुरुस्त केले जातील, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले.
घरकुलमधील पाणीटंचाई होत होती. याबाबत विचारणा केली असता गेल्या चार दिवसांपूर्वी जलवाहिनीचे काम करीत असताना पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. वायूचा अडथळा पूर्ण निघाली नव्हता. त्यामुळे दोन-तीन दिवस पाणी कमी जास्त येत होते. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये पाणी व्यवस्थित पूर्वपदावर येईल, असे सांगण्यात आले. सोसायटींना आलेले वाढीव पाणी बिलाबाबतही त्यांनी तक्रार केली. भाजी मंडई मधील गैरसोयीमुळे भाजी मंडईमधील दुकानदार रस्त्यावर बसावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.