कचऱ्यावरील निर्णय म्हणजे घरचा आहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्यावरील निर्णय म्हणजे घरचा आहेर
कचऱ्यावरील निर्णय म्हणजे घरचा आहेर

कचऱ्यावरील निर्णय म्हणजे घरचा आहेर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : केंद्र सरकारने २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन कायदा लागू केला. त्यानुसार, महापालिकेने शहरातील मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्‍त यांना त्याला तात्पुरती स्थगिती देण्याची केलेली सूचना म्हणजे भाजपाला घरचा आहेर आहे, अशी टिका आम आदमी पक्षाने केली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याला चक्‍क पुण्याच्या पालकमंत्र्यांनीच एक प्रकारे विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने देशातील शहरांमध्ये असलेल्या सोसायट्या आणि त्याठिकाणी असलेली व्यवस्था यांची पाहणी व अभ्यास न करता ‘आले मनात केला कायदा’ या भूमिकेतून कायदा संमत केला आहे. परंतु, तो कायदा अमलात आणताना केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकीनऊ आले आहे. परंतु, भाजपाचे नेते केंद्राच्या कायद्याला एक प्रकारे स्थगिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत आहेत. हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप ‘आप’चे चेतन बेंद्रे यांनी केला आहे.