नवीन पोलिस वाहनांसाठी दोन कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन पोलिस वाहनांसाठी दोन कोटींचा निधी
नवीन पोलिस वाहनांसाठी दोन कोटींचा निधी

नवीन पोलिस वाहनांसाठी दोन कोटींचा निधी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या वाहनांची कमतरता असून नवीन वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय, सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचा पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, काकासाहेब डोळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप तसेच इतरही वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘पोलिस आयुक्तालयात भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. नवीन इमारत, कर्मचाऱ्यांची कमतरता, वाहनांची अपुरी संख्या असे विविध प्रश्न आहेत. सध्या पोलिस आयुक्तालयात किती मनुष्यबळ आहे, किती आवश्यकता आहे. हे समजून घेतले. काही वाहनांची आवश्यकता असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटींचा निधी मंजूर केला. त्यामधून अद्ययावत गाड्या घेणे शक्य होईल. बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपक्रम सुरु असून याचीही माहिती घेतली. पूर्वी पोलिस वसाहतींची मागणी असायची. मात्र, पोलिसांना चांगले घरभाडे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे, ते बाहेर राहण्यास प्राधान्य देतात. किंवा स्वतःचे घर घेऊन त्या भाड्यातून हप्ते भरतात. त्यामुळे, काही ठिकाणी वसाहतीतील घरे रिकामी आहेत. मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’’