दीपावली निमित्त शिधा पत्रिका धारकांना ''आनंदाचा शिधा'' मोफत वाटप करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपावली निमित्त शिधा पत्रिका धारकांना ''आनंदाचा शिधा'' मोफत वाटप करा
दीपावली निमित्त शिधा पत्रिका धारकांना ''आनंदाचा शिधा'' मोफत वाटप करा

दीपावली निमित्त शिधा पत्रिका धारकांना ''आनंदाचा शिधा'' मोफत वाटप करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : दीपावली निमित्त शिधापत्रिका धारकांना ''आनंदाचा शिधा'' वाटप करताना लाभार्थींकडून १०० रुपये न घेता हा शिधा मोफत द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याशिवाय, परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची भरीव मदत मिळावी, असेही भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करताना लाभार्थींकडून १०० रुपये घेऊन साखर, रवा, चणाडाळ, पामतेल प्रत्येकी एक किलो असे चार किलोचे किट शासनाच्या वतीने वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे. दिवाळी सुरु झाली असताना ९५ टक्के लाभार्थी या किटपासून आज वंचित आहेत. खरे तर दिवाळी सुरू होण्यापूर्वी चार-आठ दिवस अगोदरच हे आपले आनंदाचे किट लाभार्थींना मिळाले असते. तर गोरगरिबांचा आनंद द्विगुणित झाला असता. मात्र, आनंदाचा शिधा या आपल्या चार किलोच्या किटवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले स्टिकर्स वेळेत छापून न आल्यामुळे या किट वाटपाला उशीर होतो की काय? असा प्रश्न आमच्या समोर उभा राहत आहे.