फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा
फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा

फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : फसवणूक करीत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला.
याप्रकरणी विलास दगडू चव्हाण (रा. बावधन खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय दीपक धनवे (रा. एकता कॉलनी, शिवानंद चौक, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या कारणास्तव उसनवारी पैशांची मागणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी त्यास विश्वासाने पैसे दिले. मात्र, नंतर मी पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, मला माझ्या पद्धतीने काय करायचे ते करतो, तुला दुकान खोलु देणार नाही, गोळ्या घालीन, अशा स्वरूपाच्या धमक्या देत आहे. त्याचप्रमाणे फिर्यादीच्या मालकीच्या दुकानाचे नावे खोटी बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे दुकानावर कर्ज काढले. तसेच फिर्यादीचे दुकान त्याचे असल्याचे भासवून फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------