वल्लभनगर आगारात तोबा गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वल्लभनगर आगारात तोबा गर्दी
वल्लभनगर आगारात तोबा गर्दी

वल्लभनगर आगारात तोबा गर्दी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः दिवाळी सुटीमुळे बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांनी वल्लभनगर एसटी आगारात शुक्रवारी पहाटेपासूनच तोबा गर्दी केली आहे. गेल्यावर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत नोव्हेंबरमध्ये संप पुकारला होता. त्यामुळे आगारात शुकशुकाट होता. मात्र, यंदा प्रवाशांच्या गर्दीने आगार फुलले आहे. आगारापेक्षा परगावातील आलेल्या एसटी बस सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.

दिवाळीमध्ये शहरातून लोक आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे वल्लभनगर आगारात प्रवाशांनी गर्दी केली होती. गावाला जाऊन सण मोठ्या आनंदात व उत्साही वातावरणात नातेवाइकांबरोबर साजरा करता येणार, याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सकाळी बोचरी थंडी पडल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे लहान मुलांना कानटोपी, स्वेटर घालूनच आगारात येत होते. आगारात प्रमाणापेक्षा जास्त गाड्या आल्याने काही गाड्या या बाहेरूनच मार्गस्थ होत होत्या, तर काही प्रवासी गाडीच्या चौकशीसाठी गर्दी करत होते.

डिझेल समस्या जैसे थे
येथून सकाळच्या सत्रात लांब पल्ल्याच्या गाड्या राज्यातील विविध ठिकाणी जात असतात. पण ऐन दिवाळी सणात १५ दिवसांपासून वल्लभनगर आगारातील बसमधील डिझेल संपलेले आहे. अद्याप समस्या कायम आहे. त्यात महामंडळाने पेट्रोल पंपचालकाची थकबाकी न भरल्याने येथील महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बसच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सध्या फक्त एक हजार लिटर पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे सकाळच्या बस सोडल्यानंतर दुपारच्या बसना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे दुपारनंतर सणाला आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांचा मात्र खोळंबा होत आहे.

००६८६