पूलाच्या कठड्यावर मोटार राहिली अधांतरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूलाच्या कठड्यावर मोटार राहिली अधांतरी
पूलाच्या कठड्यावर मोटार राहिली अधांतरी

पूलाच्या कठड्यावर मोटार राहिली अधांतरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : चिंचवड लिंकरोडवरून शगुन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील इंदिरा गांधी पूलावर एक मोटार कठड्याला धडकली. अपघातानंतर ही मोटार कठड्यावरच अडकली. सुदैवाने, या घटनेत मोटारचालक सुखरूप राहिला.
सचिन पाटील असे त्या मोटार चालकाचे नाव आहे. शनिवारी (ता.२२) सकाळी साडेसातच्या सुमारास (एमएच १४ डीएफ ५१००) या क्रमांकाची मोटार चिंचवड लिंक रोडने पिंपरीतील शगुन चौकाच्या दिशेने जात होती. दरम्यान, अचानक मोटारीचा वेग वाढल्याने पुलाच्या कठड्याला धडकून ती कठड्यावरच अडकली. याच पूलाखाली विविध दुकाने असून अपघात घडला त्यावेळी या दुकानांमध्ये काही लोक होते. मात्र, ही मोटार कठड्यावरच अडकल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काही वेळातच मोटार बाजूला घेतली.